file photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय बंद झालं तर चिमुकल्यांचं....

मधुकर कांबळे

औरंगाबाद - शहरातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय चांगले चालवले जावे, त्याची मान्यता कायम राहावी याकरिता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला दुरुस्त्या सुचविल्या होत्या; मात्र वर्ष सरले तरी दुरुस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या वर्षी प्राधिकरणाने दिलेली एक वर्षाची मुदत या महिन्यात २९ तारखेला संपत आहे. दुरुस्तीची कामे झाली नसल्याने उन्हाळ्यात प्राण्यांचे हाल होणार आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी निधी असतानाही प्रशासनाच्या दप्‍तरदिरंगाईत ही कामे अडकलेली आहेत.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी २० प्रकारच्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत. महापालिकेला दुरुस्तीच्या वारंवार सूचना केल्या आहेत. गेल्या वर्षी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली होती. आदेश देऊनही प्राणिसंग्रहालयात दुरुस्ती केली नसल्याने थेट प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आली.

त्यानंतर महापालिकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय अधिकाऱ्यांची मनधरणी करून एक वर्षाची मुदत देण्याची विनंती केली होती. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेत प्राणिसंग्रहालय विभागाची आढावा बैठक घेत केंद्राने सुचविलेल्या दुरुस्ती कामांचे तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले होते. 

गेल्या एप्रिलपासून २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत प्राणिसंग्रहालयाच्या खात्यात १ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. त्यातून ही कामे करण्याचेही महापौरांनी आदेश दिले होते; मात्र अद्यापही प्रशासनाने या कामाला प्रारंभ केलेला नाही. काही कामे अद्यापही कागदावरच आहेत. काही कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. त्यामुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाची मान्यता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे.

मान्यता रद्द होऊ देणार नाही : महापौर

याबाबत महापौर घोडेले म्हणाले, प्राधिकरणाने सुचविलेली बरीच कामे केली आहेत. पिंजऱ्यांची दुरुस्ती केली आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना त्रास होणार नाही, यासाठी कूलर, जाळ्या लावण्यात येतील. कोणत्याही स्थितीत प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द होऊ दिली जाणार नाही. महिनाभरात केंद्राने सुचविलेली सर्व कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.

दुरुस्तीची कामे करण्यासाठी संबंधित प्रभाग अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना प्राणिसंग्रहालयाकडून पत्रे पाठवली आहेत. ही कामे केली नाही तर प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द होऊ शकते. मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. आता दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत. काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. इतर कामांच्या निविदा काढण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.
 - डॉ. बी. एस. नाईकवाडे, प्राणिसंग्रहालय संचालक.

प्राधिकरणाने सुचविली ही कामे

  •  पांढरे वाघ, पिवळे वाघ आणि बिबट्याच्या पिंजऱ्यांत मचाण.
  •  पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यातील पाण्याचा हौद दुरुस्त करणे.
  •  पाण्यातील कासवांसाठी मगरीच्या पिंजऱ्याजवळचे पिंजरे दुरुस्त करणे.
  •  काळविटांचा ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी पिंजऱ्यावरील शेडची दुरुस्ती.
  •  सायाळच्या घरातील प्लायवूडची दुरुस्ती करणे.
  •  लहान साप ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ लाकडी बॉक्स बनविणे.
  •  मगरीच्या पिंजऱ्याच्या आऊटलेटच्या चेंबरची दुरुस्ती.
  •  माकडाच्या पिंजऱ्याचे तुटलेले लोखंडी पाइप दुरुस्त करणे.
  •  नीलगाय व सांबराच्या उपचार कक्षाची, पिंजऱ्याच्या गेटची दुरुस्ती.
  •  हातगाड्यांची दुरुस्ती करणे अथवा नवीन हातगाड्या देणे.
  •  दवाखान्यातील नळदुरुस्ती व फरशी दुरुस्ती.
  •  स्टोअर रूमच्या दरवाजाची दुरुस्ती.
  •  पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती, नळदुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती.
  •  कोंडवाड्याच्या बाजूने मोकाट कुत्रे येत असल्याने तेथील गेटची दुरुस्ती.
  •  प्राणी वाहतूक करण्यासाठी नवीन वाहतूक पिंजरे बनवणे.
  •  प्राण्यांसाठी खरेदी करण्यात येणारे मांस ठेवण्यासाठी डी-फ्रीज.
  •  नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
  •  प्राणिसंग्रहालयातील रस्त्यांची दुरुस्ती.
  •  प्राण्यांच्या माहितीचे डिजिटल बोर्ड बनविणे.
  •  चांगल्या प्रतीचे डस्टबिन खरेदी करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

Latest Marathi News Live Update : बोईसर एमआयडीसीत पुन्हा आग; रिस्पॉन्सिव्ह कंपनी जळून खाक, कामगारांमध्ये भीती

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद , जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT